जाणून घ्या गाडीतून प्रवास करताना का होते उलटी

काही जणांना गाडीतून प्रवास करताना उलटी होते. या पोस्ट मध्ये आपण गाडीतून प्रवास करताना उलटी का होते हे जाणून घेणार आहे.

खरंतर प्रवास करताना उलटी होण्याचं कारण दडलं आहे आपल्या मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीत!

असं चालत मेंदूचं कामकाज

मेंदू आपल्या शरीरातील सर्व हालचालींना नियंत्रित करण्याचे काम करत असतो. यासाठी मेंदू त्वचा, कान आणि डोळे यासारख्या इंद्रियांची मदत घेतो.

brain-in-marathi

डोळ्याला समोर काय दिसत आहे, कानामध्ये कोणत्या प्रकारचे आवाज शिरत आहे, या सगळ्याची माहिती मेंदूपर्यंत पोहोचत असते.

जेव्हा तुम्ही वाहनाने प्रवास करता तेव्हा डोळ्यांकडून आणि कानकडून मेंदूला वेगवेगळ्या प्रकारचा संदेश जातो. त्यामुळे तुम्हाला उलटी होऊ शकते याला ‘मोशन सिकनेस‘ असे म्हणतात.

जेव्हा तुम्ही गाडीत बसलेला असता तेव्हा वर- खाली, उजवीकडे-डावीकडे हालचाल झाल्याची जाणीव कानांच्या मार्फत मेंदूकडे पोचवली जाते.

मात्र डोळ्यांना अशा प्रकारची हालचाल जाणवत नाही. कारण आपण समोर बघत असतो. त्यामुळे आपल्या डोळ्यांना वाटते की सगळे काही स्थिर आहे.

त्यामुळे डोळ्यांना कडून आणि कानांकडून मेंदूला वेगळा संदेश गेल्याने उलटी आल्याची भावना होते किंवा काही वेळेस उलटी देखील होते.

अशा प्रकारे गाडीतून प्रवास करताना उलटी का होते याचे उत्तर तुहाला मिळालेच असेल.

मेंदू ‘असा’ ओळखतो आवाज

आपल्या आजूबाजूचा आवाज कानाच्या पडद्यावर (Ear Drum) पर्यंत पोचवला जातो. आवाजाच्या लहरींमुळे कानाचा पडदा कंप (Vibration) पावतो. 

ear-diagram
Credit: Benjamin Gorman/ Researchgate

कानाच्या पडद्याला तीन लहान हाडे असतात. तीदेखील कंप पावतात.

त्यानंतर कानाच्या पुढच्या भागात आकृतीत दाखवल्याप्रमाणे पातळ पदार्थ असतो. आवाजामुळे तीन लहान हाडे कंप पावल्याने, त्या पातळ पदार्थात देखील कंपन (Vibrations) निर्माण होतात.

या पातळ पदार्थातच लहान केस असतात. त्याला कोकलिया (Cochlea) म्हणतात. पातळ पदार्थ कंप पावल्यामुळे त्यातील केस देखील वाकडे होतात.

मग केसांच्या हालचालीचे रूपांतर विद्युत लहरी मध्ये केले जाते. थोडक्यात कानांमध्ये आलेल्या आवाजातच रूपांतर विद्युत लहरी मध्ये केले जाते.

या लहरी ऑडीटोरी नर्व्ह (Auditory Nerve) मार्फत मेंदूला पाठवल्या जातात. त्यानंतर मेंदू आपल्याला कोणता आवाज आला आहे हे ओळखतो.

‘मोशन सिकनेस’ पासून वाचायचे उपाय

गाडीत बसताना पुढच्या सीटवर बसा. जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल, तर ज्या दिशेला ट्रेन चालली आहे त्याच दिशेला तोंड करून बसा.

मोशन सिकनेस मुळे मळमळण्याचा त्रास देखील होतो. त्यामुळे सिगारेट आणि अल्कोहोलच्या वासापासून दूर राहा.

खिडकीजवळ जागा मिळाली तर उत्तमच!

प्रवासाला सुरुवात करण्याअगोदर पोट भरून अन्न खाऊ नका. त्याऐवजी हलका आहार घ्या.

मोशन सिकनेसचा त्रास होत असेल तर गाडीच्या किंवा ट्रेनच्या खिडकीतून बाहेरच्या वस्तूंकडे पहावे.

Leave a Comment