‘शुक्राची चांदणी’ म्हणून ओळखला जाणारा ग्रह नेमका कसा आहे?

पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणून शुक्राला ओळखलं जातं. आपल्या सौरमालेत दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रहाचा आकार देखील पृथ्वी एवढा आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण शुक्र ग्रहाविषयी अजून रंजक माहिती घेणार आहे.

पृथ्वीवरून जेव्हा आपण अवकाशात पाहतो, तेव्हा आपल्याला सर्वात जास्त प्रकाशमान अश्या दोन वस्तू दिसत असतात — चंद्र आणि शुक्र ग्रह.

पूर्वीचे लोक या ग्रहाला शुक्राची चांदणी म्हणून ओळखायचे. कारण हा ग्रह ताऱ्यांप्रमाणे चमकतो.

शुक्राला इंग्रजीमधून ‘व्हिनस’ असं म्हटलं जातं. हे नाव प्राचीन काळातील रोमन देवाच्या नावावरून पडलं.

सूर्यापासून शुक्र ग्रह सरासरी दहा कोटी 80 लाख किलोमीटर अंतरावर आहे. सूर्याची किरणे या ग्रहावर पडण्यासाठी सहा मिनिटांचा कालावधी लागतो. या ग्रहाचा व्यास 12,104 किलोमीटर एवढा आहे.

शुक्र ग्रहाचा दिवस तेथील वर्षापेक्षा मोठा असतो

पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा वेळ लागतो, त्याला आपण 1 दिवस म्हणतो. तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवसांचा कालावधी लागतो.

शुक्र ग्रहाचा विचार केला तर त्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 225 दिवस लागतात. मात्र स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 243 दिवसांचा कालावधी लागतो. याचाच अर्थ शुक्रावरील एक दिवस हा तेथील एका वर्षापेक्षा मोठा असतो.

कारण शुक्र ग्रह स्वतःच्या अक्षाभोवती (axis) 6.52 किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने फिरतो. या तुलनेत पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती 1674.4  किलोमीटर प्रति वेगाने फिरत असतो.

यावरून आपल्याला या दोन ग्रहांच्या स्वतःभोवती फिरण्याच्या वेगातील फरक लक्षात येईल.

बुधग्रहापेक्षा शुक्र ग्रहाचे तापमान जास्त आहे

सूर्यमालेचा विचार केला तर सूर्यापासून सर्वात जवळच्या अंतरावरचा ग्रह म्हणजे बुध. त्यानंतर येतो शुक्र.

आपल्याला असे वाटू शकते की, बुध ग्रहाचे तापमान खूप जास्त असेल. मात्र आपल्या अपेक्षेच्या उलट शुक्र ग्रह हा जास्त उष्ण आहे.

या पाठीमागचे कारण असे आहे की या ग्रहावर कार्बन-डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर या ग्रहाच्या वातावरणात सल्फ्युरिक ॲसिडपासून बनलेले ढग आहेत.

हे ढग सूर्याकडून आलेल्या उष्णतेला पकडून ठेवतात आणि याचा परिणाम म्हणून शुक्र ग्रहाचे तापमान बुध ग्रहापेक्षा जास्त आहे.

शुक्र ग्रहाचे पृष्ठभागाचे तापमान 470 डिग्री सेल्सियस एवढे आहे.

शुक्र ग्रहाला नैसर्गिक उपग्रह नाही

सूर्यमालेतील ग्रह स्वतःभोवती प्रदक्षिणा घालत असताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असतात — शुक्र आणि युरेनस ग्रहाचा अपवाद वगळता.

हे दोन ग्रह स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असतात. करोडो वर्षांपूर्वी एखादी वस्तू या ग्रहाला धडकलेली असावी. जेणेकरून या ग्रहांची फिरण्याची दिशा बदलली असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

सूर्यमालेत गुरु आणि शनी ग्रहाला कडा आहेत. मात्र शुक्राला कोणत्या प्रकारच्या कडा नाहीत. त्याचबरोबर सर्वात विशेष गोष्ट म्हणजे याला कोणत्याही प्रकारचा नैसर्गिक उपग्रह नाही.

शुक्र ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता

आजपर्यंत अनेक यानांनी या ग्रहाला भेट दिलेली आहे. मात्र वर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणचे तापमान जास्त असल्याने त्यांचे इलेक्ट्रॉनिक घटक लवकर खराब होतात.

मात्र शास्त्रज्ञांनुसार या ग्रहाच्या वरच्या भागात जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. कारण या भागातील तापमान पृथ्वीवरील तापमानात एवढेच आहे.

ही होती ‘शुक्राची चांदणी’ अर्थात शुक्र ग्रहाविषयी माहिती.

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. शेअर केल्याने ज्ञान वाढते.

Leave a Comment