जाणून घ्या ‘गोल्डन मिल्क’ अर्थात हळदीच्या दुधाचे फायदे

सर्दी झाली किंवा डोकं दुखत असले तर तुमची आई तुम्हाला नक्कीच गोल्डन दूध बनवून देत असेल. खरंतर गोल्डन मिल्क आपण सगळेजण लहानपणापासून पित आलेलो आहे. हे गोल्डन मिल्क दुसरं तिसरं काही नसून हळदीचे दूध आहे. या आजच्या लेखातून आपण हळदीच्या दुधाचे फायदे जाणून घेणार आहे, चला तर सुरु करूया.

आपल्या भारतातील हळदीचे दूध हे जागतिक स्तरावर गोल्डन मिल्क(Golden Milk) म्हणून प्रसिद्ध आहे. या दुधामध्ये हळद, आलं आणि दालचिनीचा वापर केला जातो.

हळदीचे दूध पिल्यानंतर शरीराला नेमके काय फायदे होतात हे आपण पाहणार आहे

हळदीच्या दुधाचे फायदे

turmeric-milk

अनेक आजारांपासून रक्षण

हळदीच्या दुधामध्ये हळद हा प्रमुख घटक असतो. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा एक घटक आढळतो.

यामुळेच हळदीला तिचे औषधी गुणधर्म प्राप्त होतात. करक्यूमिन मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत.

संशोधनानुसार आपल्या आहारात एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला तर आजार होण्याची शक्यता कमी होते.

त्याचबरोबर या दुधामध्ये दालचिनी आणि आल्याचा वापर केला जातो. या पदार्थांकडे देखील मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत.

मूड सुधारण्यासाठी फायदेशीर

हळदीच्या दुधात करक्यूमिन या घटकाचे प्रमाण जास्त असते हे आपण अगोदरच पाहिले आहे.

काही संशोधनानुसार या घटकामुळे ताण तणावाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. एका सहा आठवड्याच्या अभ्यासात 60 जणांचा अभ्यास करण्यात आला होता.

ज्यांना ताण-तणावाच्या संबंधी आजार आहेत, त्यातील काही जणांना करक्यूमिन घेण्यास सांगितले तर काही जणांना ताण-तणावाच्या गोळ्या घेण्यास सांगितल्या.

विशेष म्हणजे ज्या लोकांना करक्यूमिन दिले होते, त्यांच्यात ताणतणावाच्या गोळ्या खाणाऱ्यांएवढी सुधारणा झाली होती.

या क्षेत्रात काही प्रमाणात अभ्यास झालेला आहे. तरी मजबूत असा निष्कर्ष निघण्यासाठी अजून अभ्यासाची गरज आहे.

milk-turmeric

हृदय रोगांपासून देखील संरक्षण

हळदीच्या दुधामध्ये हळदी सोबत आलं तसेच दालचिनीचा देखील समावेश असतो.

एका अभ्यासानुसार टाईप टू मधुमेह असणाऱ्या 41 जणांना दररोज दोन ग्रॅम आल्याची पावडर दिली होती. बारा आठवड्यानंतर संशोधकांना असे आढळून आले की या 41 लोकांमध्ये ह्रदयाच्या संबंधी आजाराची शक्यता 23 ते 28 टक्‍क्‍यांनी कमी झाली.

त्याचबरोबर हळदीमध्ये असणारे करक्यूमिन रक्तवाहिन्यांचे आरोग्य देखील सुधारण्यासाठी मदत करू शकते. अर्थात रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले असेल तर हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते.

पचनशक्ती देखील वाढते

जर माणसाचे जठर वेळेवर रिकामे झाले नाही तर अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. मात्र हळदीच्या दुधामध्ये असणाऱ्या आल्यामुळे ही प्रक्रिया वेगाने होते. आणि अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

त्याचबरोबर हळदीमुळे देखील चरबीयुक्त पदार्थांचे पचन होण्यास मदत होते.

विटामिन डी मिळण्यास फायदेशीर

आपल्या आहारात कॅल्शिअमचे प्रमाण कमी असेल तर हाडांमधील कॅल्शियम रक्तात उतरायला सुरुवात होते.

रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण योग्य ठेवणे हे त्या मागचे कारण असते. त्यामुळे मात्र हाडे कमजोर आणि ठिसूळ होऊ शकतात.

त्याचबरोबर आहारातील कॅल्शिअमचे शोषण शरीरात करण्यासाठी विटामिन डी ची आवश्यकता असते.

गाईचे दूध हे तसेच कॅल्शिअम चांगला स्रोत आहे. त्यामुळे कॅल्शियम सोबतच व्हिटॅमिन डीची देखील गरज हळदीच्या दुधातून भागू शकते.

अशाप्रकारे ‘गोल्डन मिल्क’ हळदीच्या दुधाचे फायदे तुम्हाला समजले असतील.

turmeric-milk-marathi

असे बनवा ‘गोल्डन मिल्क’ अर्थात हळदीचे दूध

साहित्य:

अर्धा कप दूध

एक चमचा हळद

आल्याचा लहान तुकडा

अर्धा चमचा दालचिनी

एक चमचा मध

गोल्डन मिल्क अर्थात हळदीचे दूध करण्यासाठी पातेल्यात वर दिलेले सगळे पदार्थ टाकावेत. त्यानंतर ते गरम करा.

उकळी फुटल्यानंतर गॅस कमी करा आणि दहा मिनिटे झाकून ठेवा. त्यामुळे दालचिनी आणि आल्याचा सुगंध तसेच त्याचे गुणधर्म दुधात उतरतील.

त्यानंतर तयार झालेले दूध भांड्यात गाळून घ्या. तुमचे ‘गोल्डन मिल्क’ अर्थात हळदीचे दूध तयार!!

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. शेअर केल्याने ज्ञान वाढते.

Leave a Comment