झोपेविषयी जाणून घ्या 8 रंजक गोष्टी

प्रत्येकाच्या आयुष्यात झोपेला खूप महत्त्व आहे. सरासरी माणूस आपल्या आयुष्यातील पंचवीस वर्ष झोपण्यासाठी घालवत असतो. या लेखातून तुम्हाला झोपेविषयी काही रंजक गोष्टी सांगणार आहे.

थकलेल्या शरीराला पुन्हा ऊर्जा देण्यासाठी झोप महत्त्वाची असते.

झोपेविषयी रंजक गोष्टी

1. पृथ्वीवर माणूस असा एकमेव सस्तन प्राणी आहे की जो स्वतःच्या इच्छेने उशिरा झोपू शकतो.

इतर सस्तन प्राण्यांकडे अशाप्रकारची क्षमता नसते.

2. व्यायाम केल्याने चांगली झोप लागते. त्याच बरोबर व्यायाम केल्याने झोपेची गुणवत्ता देखील चांगली असते.

मात्र झोपायच्या काही वेळ अगोदर व्यायाम केला, तर मात्र झोप लागायला अडचण निर्माण होते.

त्यामुळे शक्यतो झोपायच्या अगोदर व्यायाम करू नये.

benefits-of-good-sleep-in-marathi

3. जास्त उंचीवर झोप लागायला अडचण निर्माण होते. 13,000 फुटापेक्षा जास्त उंचीवर जोप न लागण्याची समस्या आणखी तीव्र होते. कारण इतक्या उंचीवर ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी असते.

अधिक उंचीवर शरीराला जुळवून घेण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो.

4. दिवसभरातील दोन वेळेला आपल्याला थकल्यासारखे होते — दुपारी दोन वाजता आणि रात्री दोन वाजता . या वेळेला आपल्याला झोप लागल्यासारखे होते. आहे ना मजेशीर!

5इंटरनॅशनल क्लाॅसिफिकेशन ऑफ स्लिप डिसोर्डर्स यांच्यानुसार जे लोक शिफ्टमध्ये काम करतात त्यांना हृदयासंबंधी, पचनासंबंधीचे आजार होण्याची जास्त शक्यता असते.

6. ज्या लोकांची चांगली झोप होत नाही त्यांना जास्त भूक लागते असे निर्देशनास आले आहे.

कारण शरीरात लेप्टिन नावाचे हार्मोन भूक नियंत्रित करण्यासाठी कारणीभूत असते.

चांगली झोप न झाल्याने या हार्मोनचे प्रमाण कमी होते आणि भुकेची भावना वाढते. याचा परिणाम म्हणून लठ्ठपणा येणे यांसारख्या आजाराला सामोरे जावे लागते.

7. काहीजणांना इच्छा असूनही साखर खाण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही.

जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनने या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार अपुरी झोप हे यामागचे कारण असू शकते.

8. अनेक जणांना झोपेत स्वप्न पडत असतात. झोपेतून उठल्यावर पाच मिनिटातच लगबग 50% स्वप्न तुम्ही विसरून जाता, तुम्हाला फक्त 50% स्वप्न आठवतात.

अशाप्रकारे तुम्हाला झोपेविषयी काही रंजक गोष्टी नक्कीच समजल्या असतील.

Leave a Comment