प्रेम मेंदूत सुरू होतं, हृदयात नाही; जाणून घ्या प्रेमामागचं रंजक विज्ञान

खरं तर प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी प्रेम होत असतं. आपण प्रेमाच्या भावनेला हृदयासोबत जोडत असतो. या लेखातून आपण प्रेमामागचं रंजक विज्ञान जाणून घेणार आहे.

आपण नेहमी म्हणत असतो की जर दोघांची ‘केमिस्ट्री’ जुळून आली तरच प्रेम फुलतं. यातील ‘केमिस्ट्रीचा’ नेमका अर्थ काय याचा शोध घेणं गरजेचं आहे.

जर प्रेमाकडे एक प्रक्रिया म्हणून बघितलं तर यामागचं विज्ञान नक्कीच समजेल.

आपण जे काम करत असतो ते मेंदूत तयार होणाऱ्या रसायनांवर अवलंबून असतात. त्यांना इंग्रजी भाषेत ‘हार्मोन्स’ असे म्हणतात. हे हार्मोन्स तुमचा राग, भूक, लैंगिक इच्छा, आनंद या सारख्या भावना नियंत्रित करत असतात.

उत्क्रांती आणि प्रेमाची भावना

प्रेमाच्या भावनेची सुरुवात उत्क्रांतीमध्येच दडलेली आहे. या प्रेमाच्या भावनेचं पहिलं कारण पुनरुत्पादन असतं.

पुनरुत्पादन करण्याची गरज आणि त्यासाठी लागणारी भावना ही उत्क्रांतीची देणगीच म्हणावी लागेल.

स्त्री आणि पुरुषांमध्ये ही भावना जागृत करण्यासाठी मेंदूत विशिष्ट हार्मोन्स तयार होतात.

स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते तर पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉनचे प्रमाण जास्त असते. हे हार्मोन्स म्हणजे प्रेमाचा पहिला टप्पा असतो.

कारण या हार्मोन्सच्या निर्मितीमुळे स्त्री-पुरुष एकमेकांकडे आकर्षित होतात.

हृदयाची धडधड कधी वाढते

तुम्ही जेव्हा आवडत्या व्यक्तीला पाहता, तेव्हा तुमचं हृदय जोरजोरात धडकु लागते. हाताला घाम फुटतो. त्याच्यामागे देखील मेंदूतील हार्मोन्सचीच जादू आहे.

त्यावेळेला शरीरात डोपामाइन, फिनेल ईथील अमाईन आणि नोरेफिनेफ्रिन या हार्मोन्सची निर्मिती होते.

science-behind-love-in-marathi

डोपामाइन हार्मोनला ‘आनंद देणारे रसायन’ म्हणून ओळखले जाते. कारण शरीरात जेव्हा हे रसायन निर्माण होते, तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो.

त्याचबरोबर नोरेफिनेफ्रिनमुळे हृदय जोरात धडकणे, उत्सुकता निर्माण होणे यासारख्या गोष्टी घडतात. तसेच जेवणाचं, झोपेचं वेळापत्रक बिघडतं.

जेव्हा हे दोन हार्मोन्स तुमच्या शरीरात निर्माण होतात, तेव्हा तुमची झोप उडते, भूक लागत नाही. फक्त कोणालातरी मिळवण्याची इच्छा तीव्र इच्छा निर्माण होते. या दोन रसायनांची निर्मिती महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त होते.

सिरोटीन हार्मोनची कामगिरी

तुमच्या शरीरात सिरोटीन नावाचे हार्मोन देखील तयार होत असतं. जेव्हा तुम्ही प्रेमात पडता, तेव्हा संशोधकांना असे आढळून आले आहे की ह्या हार्मोन्सचं प्रमाण देखील कमी होतं.

हे हार्मोन तुमचा मूड, सामाजिक वागणं, लैंगिक इच्छा, खाण्याची इच्छा यासारख्या गोष्टींना नियंत्रित करतो.

त्याचबरोबर शास्त्रज्ञांना असं वाटतं की या हार्मोनच कमी प्रमाण डिप्रेशन अर्थात ताणतणावासाठी कारणीभूत ठरतं.

प्रेमामागचं विज्ञान

मानवी मेंदू एवढा गुंतागुंतीचा आहे की त्याची प्रत्येक बाजू समजून घ्यायला अजून वेळ लागणार आहे.

त्यामुळे शास्त्रज्ञांना अजूनही प्रेमाच्या भावनेचं विज्ञान पूर्णपणे समजलं नाही. यासाठी अजूनही संशोधनं चालू आहेत. मात्र एक गोष्ट नक्की आहे की तुमचं प्रेम हृदयात नव्हे तर मेंदूत सुरू होतं.

थोडक्यात प्रेमामागचं विज्ञान तुम्हाला नक्कीच समजलं असेल.

ज्या वेळेला तुमच्या मनात प्रेमाची भावना तयार होईल, तेव्हा मेंदूत तयार होणाऱ्या या रसायनांचं नक्कीच आभार माना.

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. शेअर केल्याने ज्ञान वाढते. 

Leave a Comment