जाणून घ्या सूर्यमालेतील शनी ग्रहाविषयी रंजक माहिती

सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह जो पाण्यावर देखील तरंगू शकतो, असा ग्रह म्हणजे शनी ग्रह. या लेखाच्या माध्यमातून आपण शनी ग्रहाविषयी रंजक माहिती घेणार आहे.

चला तर सुरु करूया प्रवास शनी ग्रहाचा!

शनी हा सूर्यापासून सहाव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तसेच गुरु ग्रहानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह देखील शनी आहे.

या ग्रहाला इंग्रजीतून ‘सॅटर्न’ असे म्हणले जाते.

शनी ग्रहाविषयी माहिती

saturn-facts-in-marathi

1. पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या पाच ग्रहांपैकी एक ग्रह शनी आहे.

त्याच बरोबर शनी हा ग्रह पाचव्या क्रमांकाचा सर्वात जास्त चमकणारी अवकाशातील वस्तू आहे.

सुंदर कडा

2. या ग्रहाच्या कडेने सुंदर अशा कडा आहेत. या कडा बर्फाचे तुकडे आणि धुळीच्या कणांनी बनल्या आहेत.

या कडा शनी ग्रहापासून 12 हजार 700 किलोमीटरवर पसरल्या आहेत.

सूर्याभोवती एक फेरी

3. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवसांचा कालावधी लागतो.

मात्र शनी ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 29.5 वर्षांचा कालावधी लागतो. बापरे!!

4. पृथ्वीवर काही ठिकाणी वारे खूप वेगाने वाहत असते. मात्र सूर्यमालेत शनी ग्रहावर सर्वात वेगाने वारे वाहते.

या ग्रहावर वाऱ्याचा वेग साधारण 1800 किलोमीटर प्रतितास इतका प्रचंड आहे.

सर्वात कमी घनता

5. जर शनीग्रहाच्या आकारापेक्षा मोठ्या आकाराचा पाण्याने भरलेला समुद्र अस्तित्वात असता, तर शनी ग्रह त्या समुद्रात अक्षरशः तरंगला असता. कारण या ग्रहाची घनता सूर्यमालेत सर्वात कमी आहे.

हा ग्रह हायड्रोजन या वायू पासून बनलेला असल्यामुळे त्याची घनता खूप कमी आहे.

6. आपल्या पृथ्वीला फक्त एकच उपग्रह आहे –चंद्र. मात्र शनी ग्रहाला 82 चंद्र असून सगळे चंद्र गोठलेल्या अवस्थेत आहे. टायटन आणि रिया नावाचे चंद्र हे सगळ्यात मोठे आहेत.

शनीचे उपग्रह

titan

7. टायटन हा शनी ग्रहाचा उपग्रह असून हा उपग्रह सूर्यमालेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उपग्रह आहे. पहिल्या क्रमांकाचा सर्वात मोठा उपग्रह गुरु ग्रहाचा गेनिमेड आहे.

टायटन चंद्रावर दाट आणि गुंतागुंतीचे वातावरण आहे. हे वातावरण नाइट्रोजन तसेच खडक आणि बर्फानी बनलेलं आहे.

या चंद्रावर मिथेन द्रव अवस्थेत आहे. त्याचबरोबर नायट्रोजन देखील गोठलेल्या अवस्थेत आहे. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की टायटन चंद्रावर जीवसृष्टीची असण्याची शक्यता आहे.

मात्र ती पृथ्वीवरच्या जीवसृष्टीपेक्षा वेगळी असेल.

फिक्कट पिवळा रंग

8. शनी ग्रह फिक्कट पिवळ्या रंगाचा दिसतो. कारण या ग्रहाच्या वरच्या वातावरणाच्या भागात गोठलेल्या अवस्थेत अमोनिया आहे.

शनी ग्रहाचा अंतर्गत भाग हा खूप उष्ण आहे. तेथील तापमान हे 11,700 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते.

वातावरण

9. शनी ग्रहाच्या वातावरणात साधारण 96 टक्के हायड्रोजन आहे. तर 4 टक्के हेलियम आहे. त्याचबरोबर अमोनिया, अॅसिटिलीन, इथिलिन मिथेन यांचादेखील अंश आहे.

10. शनीच्या वातावरणाची जाडी जवळपास 60 किलोमीटर एवढी आहे. सगळ्यात वरच्या थरांमध्ये वाऱ्याचा वेग 1800 किलोमीटर प्रतितास इतका प्रचंड असतो.

सूर्याचा प्रकाश पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी

11. शनी ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर पृथ्वी पेक्षा 9.5 पटीने जास्त आहे. त्यामुळे सूर्याचा प्रकाश शनीवर पोहोचण्यासाठी एक तास 20 मिनिटांचा कालावधी लागतो.

त्याचबरोबर सूर्यापासून शनी ग्रहाचे अंतर जास्त असल्याने शनीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 10 हजार 756 दिवसांचा कालावधी लागतो.

स्वतःभोवती वेगाने फिरणारा ग्रह

12. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. मात्र शनी ग्रहाला फक्त 10 तास 45 मिनिटांचा कालावधी लागतो.

गुरु ग्रहानंतर स्वतःभोवती सर्वात वेगाने फिरणारा ग्रह म्हणून शनीला ओळखले जाते.

13. शनी ग्रहाचे सर्वात प्रमुख ओळख म्हणजे त्याच्या कडा. या कडा बर्फाच्या करोडो कणांनी बनलेल्या आहेत.

बर्फावरून सूर्यप्रकाश सहजरीत्या परावर्तित होतो.

त्यामुळे पृथ्वीवरच्या टेलिस्कोपच्या मदतीने देखील शनीच्या कडा पाहणे शक्य होते.  शनीच्या भोवती बनलेल्या कडांच्या निर्मितीमागे एक सिद्धांत सांगितला जातो.

एक मध्यम आकाराचा चंद्र शनी ग्रहाभोवती फिरत असताना शनीच्या जवळ गेला. त्यामुळे त्याचे तुकडे होऊन ते अवकाशात विखुरले गेले.

सूर्यापासूनचे अंतर

15. शनी ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 142 करोड 66 लाख 66 हजार 422 किलोमीटर एवढे आहे.

या ग्रहाच्या पृष्ठभागच तापमान साधारण -139 डिग्री सेल्सिअस एवढे असते.

शनी ग्रहाचे निरीक्षण

गॅलेलियो गॅलिली दुर्बिणीच्या माध्यमातून शनी ग्रहाला पाहणारा पहिला व्यक्ती

गॅलेलियो गॅलिली हा दुर्बिणीच्या माध्यमातून शनी ग्रहाला पाहणारा पहिला व्यक्ती होता. गॅलेलियो गॅलिलीने 1610 मध्ये स्वतः बनवलेल्या दुर्बिणीतून शनी ग्रहाचे निरीक्षण केले होते.

शनी ग्रहाचा आकार इतका मोठा आहे की यामध्ये 763 पृथ्वी सामावू शकतात.

शनी ग्रहावरच्या मोहिमा

पायोनियर 11

हे यान शनी ग्रहावर 1 सप्टेंबर 1979 मध्ये पोहोचले. हे यान शनी ग्रहाच्या पृष्ठभागापासून 22,000 किलोमीटर उंचीवर होते  या यानाने सर्वात प्रथम शनीचे जवळून छायाचित्र घेतले.

हे छायाचित्र 1973 मध्ये पायोनियर 11 या यानाने घेतले होते .यामध्ये शनी ग्रह आणि त्याचा चंद्र टायटन दिसत आहे.
Image credit: NASA Ames

त्याचबरोबर माहीत नसलेल्या शनि ग्रहाच्या कडा देखील शोधून काढण्यास मदत केली.

व्हॉयेजर 1

हे यान शनी ग्रहावर 12 नोव्हेंबर 1980 मध्ये पोहोचले. हे यान शनी ग्रहाच्या पृष्ठभागापासून 1,24,000 किलोमीटर उंचीवर होते. तेथून शनी ग्रहाची आणि त्याच्या कडांची मनमोहक छायाचित्रे पाठवली.

हे यान पुढे अनंताच्या प्रवासाला निघून गेले.

व्हाॅयेजर 2

हे यान शनी ग्रहावर 26 ऑगस्ट 1981 मध्ये पोहोचले. याची शनी ग्रहाच्या पृष्ठभागापासूनची उंची 1 लाख 800 किलोमीटर एवढी होती.

हे छायाचित्र व्हाॅयेजर 2 या यानाने घेतलं होतं. हे चित्र 4 ऑगस्ट 1981 मध्ये घेण्यात आले .त्यावेळी हे यान शनी ग्रहा पासून दोन कोटी दहा लाख किलोमीटर अंतरावर होते.
Image credit: NASA/JPL

या यानाने देखील शनी ग्रहाची मनमोहक चित्रे घेतली.

अशा प्रकारे तुम्हाला शनी ग्रहाविषयी रंजक माहिती नक्कीच आवडली आहे.

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. शेअर केल्याने ज्ञान वाढते.

Leave a Comment