जाणून घ्या पृथ्वीचा उपग्रह चंद्राविषयी रंजक माहिती

लहान मुलांचा लाडका चांदोबा म्हणजेच चंद्र सगळ्यांनाच आवडत असेल. भारतीय संस्कृतीत देखील चंद्राला मानाचे स्थान आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण चंद्राविषयी रंजक माहिती जाणून घेणार आहे.

पोर्णिमा आणि अमावस्या यासारख्या खगोलीय घटना देखील चंद्रामुळे होत असतात. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे.

चंद्राची निर्मिती कशी झाली? चंद्रावर खाचखळगे का आहेत? यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. याच प्रश्नांचा वेध आपण या लेखातून घेणार आहे.

चंद्राची निर्मिती कशी झाली

चंद्राची निर्मिती जवळपास 4.5 वर्षांपूर्वी झाली आहे. सौरमालेची निर्मिती झाली तेव्हा अनेक लहान मोठ्या आकाराचे दगड अवकाशात विखुरले गेले होते.

earth-and-moon

जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली होती तेव्हा सुरुवातीच्या काळात मंगळ ग्रहाच्या आकाराचा दगड ज्याला थिया नावाने ओळखले जाते, तो पृथ्वीवर आदळला. त्यामुळे पृथ्वीच्या गर्भातील खडक अवकाशात उडाले. ते खडक गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र आले आणि चंद्राची निर्मिती झाली.

चंद्राविषयी रंजक माहिती

पाचव्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा उपग्रह

आपल्या सूर्यमालेत 181 उपग्रह आहेत. त्यातील चंद्र हा पाचव्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा उपग्रह आहे. सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा मोठा उपग्रह ग्यानीमेडे (Genymede) असून हा गुरू ग्रहाचा उपग्रह आहे.

आपण जेव्हा पृथ्वीवरून चंद्राला पाहतो तेव्हा चंद्र आपल्याला नेहमी गोलाकार दिसत असतो. मात्र त्याचा आकार अंड्यासारखा आहे.

पृथ्वीभोवती फिरण्यासाठी 27 दिवसांचा कालावधी

ज्याप्रमाणे पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवसांचा कालावधी लागतो. अगदी त्याच प्रकारे चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी 27 दिवसांचा कालावधी लागतो. चंद्राचा पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग 3,700 किलोमीटर प्रतितास एवढा आहे.

स्वतःचा प्रकाश नाही

जेव्हा आपण चंद्राचे पृथ्वीवरून निरीक्षण करत असतो तेव्हा तो चमकताना दिसतो. मात्र चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि तो परावर्तित होऊन पृथ्वीवर येतो. त्यामुळे आपल्याला चंद्र चमकत असल्याचे दिसते.

चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर 3 लाख 84,000 हजार किलोमीटर आहे.

कमी गुरुत्वाकर्षण क्षमता

पृथ्वीच्या तुलनेत चंद्राचे गुरुत्वाकर्षण 6 पटीने कमी आहे. जर एखाद्या माणसाचे पृथ्वीवर वजन 100 किलो भरत असेल तर तेच वजन चंद्रावर फक्त 16 किलो भरेल.

वातावरणाचा अभाव

चंद्राला वातावरण नाही. कारण चंद्राची गुरुत्वाकर्षण क्षमता खूप कमी आहे. त्याचबरोबर वातावरण नसल्यामुळे आवाज देखील ऐकू येत नाही. कारण आवाज ऐकू येण्यासाठी वातावरणाची गरज असते.

त्याचबरोबर वातावरणाच्या अभावामुळे चंद्रावरून आकाश नेहमी काळ्याच रंगाचे दिसते.

तापमानात प्रचंड विविधता

चंद्रावरील वातावरणात तापमानात विविधता आढळते. चंद्राचा दिवस हा अतिशय उष्ण असतो तर रात्री अतिशय थंड असते. या ठिकाणी दिवसा तापमान साधारण 134 डिग्री सेल्सिअस असते. तर रात्रीच्या वेळी तापमान उणे 153 डिग्री सेल्सिअस इतके कमी होते.

चंद्र पृथ्वीपासून लांब जात आहे

तुम्हाला जाणूनच आश्चर्य वाटेल की चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी साधारण 3.8 सेंटिमीटर लांब जात आहे. ही प्रक्रिया 50 बिलियन वर्षांपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे.

सध्या चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी  27 दिवसांचा कालावधी लागतो. 50 बिलियन वर्षांनी हा कालावधी 47 दिवसांचा असेल.

सगळ्यात उंच पर्वत

चंद्रावर मोंन्स हायजेन नावाचा पर्वत सगळ्यात उंच आहे. या पर्वताची उंची 4700 मीटर असून माऊंट एव्हरेस्ट च्या तुलनेत निम्मी आहे.

चंद्रावर सगळ्यात पहिले पाऊल

चंद्राच्या भूमीवर आतापर्यंत बारा लोकांनी आपले पाऊल ठेवले आहे. यातील सगळे प्रवासी हे अमेरिकन अंतराळवीर होते.

apollo-11-crew
डावीकडून:: नील आर्मस्ट्राँग , मायकेल कोलिन्स , बझ अल्ड्रिन अपोलो ११ मोहिमेतील अंतराळवीर

चंद्राच्या भूमीवर सगळ्यात पहिले पाऊल ठेवणारा अंतराळवीर म्हणजे नील आर्मस्ट्राँग आहे. 1969 मध्ये अपोलो 11 मोहिमेदरम्यान नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर आपले पहिले पाऊल ठेवले.

त्यांच्यासोबत दुसरे अंतराळवीर बझ अल्ड्रिन आणि मायकेल कोलिन्स होते. या मोहिमेत 382 किलो वजनाचे दगड आणि मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात आले.

चंद्रावर गेलेले सगळ्यात शेवटचे अंतराळवीर म्हणजे जीन सर्नन आहेत. 1972 मध्ये अपोलो 17 मोहिमेदरम्यान ते चंद्रावर गेले होते.

चंद्रावर मोठा खड्डा

चंद्रावर धूमकेतू, उल्कापात तसेच लघुग्रह यांच्या वर्षावामुळे मोठे खड्डे पडले आहेत. सूर्यमालेतील अशा प्रकारचा सर्वात मोठ्या खड्ड्यांपैकी एक खड्डा चंद्रावर आहे.

south-pole-aitken-polesouth-pole-aitken-pole
Image credit: NASA/Goddard दक्षिण ध्रुव आयटकेन निळ्या रंगातील

या खड्ड्याला दक्षिण ध्रुव आयटकेन (South Pole Aitken) नावाने ओळखले जाते. याचा व्यास 2500 किलोमीटर एवढा आहे. याची खोली सरासरी 15 किलो मीटर एवढी आहे.

अशाप्रकारे तुम्हाला चंद्राविषयी माहिती नक्कीच आवडली असेल.

भविष्यातील मोहिमा

2020 वर्षात जुलै, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अमेरिका आणि चीन चंद्राच्या संबंधी अवकाश मोहिमा आखणार आहेत.

2021 मध्ये भारत देश चांद्रयान-3 या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर पुन्हा लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे.

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. शेअर केल्याने ज्ञान वाढते. 

Leave a Comment