आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह म्हणजे बुध आहे. या ग्रहाला सूर्याच्या सगळ्यात जवळ राहण्याचा मान देखील मिळालेला आहे. या लेखातून आपण बुध ग्रहाविषयी माहिती जाणून घेणार आहे.
बुध ग्रहाला इंग्रजीतून ‘मर्क्युरी‘ म्हणतात. हा ग्रह सूर्यापासून 5.80 कोटी किलोमीटर अंतरावर आहे.
या ग्रहाची निर्मिती साधारणत: 4.5 बिलियन वर्षांपूर्वी झाली.
बुध ग्रहाविषयी रंजक माहिती
1 या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी मारण्यासाठी फक्त 88 दिवस लागतात आणि स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 58 दिवसांचा कालावधी लागतो.
2 बुध ग्रहावर सूर्यप्रकाश पोचण्यासाठी साधारण तीन मिनिटांचा कालावधी लागतो.
3 हा ग्रह अंडाकृती कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरत असतो आणि सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी ग्रहाला फक्त 88 दिवस लागतात.
4 सूर्यमालेतील सर्वात वेगाने प्रवास करणारा ग्रह म्हणून देखील या ग्रहाला ओळखले जाते. कारण याचा वेग 47 किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे.
मात्र स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यासाठी बुध ग्रहाला 59 दिवसांचा कालावधी लागतो.
5 या ग्रहाचा अक्ष फक्त दोन अंशांनी कललेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचे ऋतू दिसत नाहीत.
पृथ्वीचा अक्ष मात्र 23.5 अंशांनी कललेला आहे. त्यामुळे आपल्याला पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे ऋतू अनुभवायला मिळतात
6 बुध ग्रह सर्वात जास्त घनता असणारा दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. पहिल्या क्रमांकाची जागा अर्थातच पृथ्वीकडे आहे.

7 बुध ग्रहाचा पृष्ठभाग पृथ्वीच्या चंद्रासारखा आहे. धूमकेतू आणि उल्का यांच्या माऱ्यामुळे या ग्रहाच्या पृष्ठभागावर खड्डे पडलेले आहेत.
8 या ग्रहावरचे तापमान देखील प्रचंड आहे. दिवसा पृष्ठभागाचे तापमान 430 डिग्री सेल्सिअस इतके होऊ शकते.
रात्रीच्या वेळी मात्र हेच तापमान उणे 180 डिग्री सेल्सिअस इतके कमी होते.
9 संशोधकांच्या अंदाजानुसार या ग्रहाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर पाण्याचा बर्फ असण्याची शक्यता आहे.
या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता नाही. कारण येथील तापमान प्रचंड आहे त्याचबरोबर वातावरण अस्तित्वात नाही.
तसेच सौर वादळांपासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक असणारे चुंबकीय क्षेत्र देखील कमकुवत आहे.
10 पृथ्वीच्या तुलनेत या ग्रहाची गुरुत्वाकर्षण क्षमता फक्त 38 टक्के आहे.
म्हणजे एखाद्या माणसाचे वजन पृथ्वीवर 100 किलो भरत असेल तर ते वजन बुध ग्रहावर फक्त 38 किलो भरते.
ज्याप्रमाणे पृथ्वीला चंद्र आहे त्याप्रमाणे या ग्रहाला कोणताही चंद्र नाही. कमी गुरुत्वाकर्षण क्षमता असल्यामुळे या ग्रहाला चंद्र नाही.
बुध ग्रहाचा खगोलीय इतिहास
बुध ग्रह सूर्याभोवती एक फेरी इतक्या लवकर पूर्ण करतो की अगोदरच्या काळात लोकांना असे वाटायचे की, त्याठिकाणी दोन तारे आहेत.
त्यानंतर 1953 मध्ये कोपर्निकसने सूर्यमालेचे एक नवीन मॉडेल मांडले. यामध्ये सूर्य हा केंद्रस्थानी होता.
रोमन देवतेचा एक देवदूत होता. त्याचं नाव फिर्मस होते. तो अत्यंत वेगाने संदेश पोचवत असायचा. त्यावरूनच या ग्रहाला इंग्रजीत मर्क्युरी नाव पडले.
बुध ग्रहाचे वातावरण
बुध ग्रहाचे वातावरण पृथ्वीच्या तुलनेत करोडो पटींनी पातळ आहे, त्यामुळे ग्रहावरील तापमान खूप अधिक आहे. थोडक्यात या ग्रहाला वातावरण नाही असे म्हणणेच योग्य ठरेल.
एखादी ग्रहाचे वातावरण टिकून राहण्यासाठी त्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण क्षमता आणि चुंबकीय क्षेत्र महत्त्वाचे असते.
बुध ग्रहाची गुरुत्वाकर्षण क्षमता पृथ्वीच्या तुलनेत फक्त 38 टक्के एवढीच आहे. त्यामुळे बुध ग्रहावर वातावरण अस्तित्वात नाही.
त्याचबरोबर हा ग्रह सूर्याच्या खूप जवळ असल्याने त्याला सौर वादळांचा (सूर्यातून हजारो किलोमीटर लांबीचे सौर कणांचे फवारे सोडले जातात) सतत सामना करावा लागतो.
त्यामुळे थोडेफार शिल्लक राहिलेले वातावरण देखील या वादळांमुळे नष्ट होते.
अशाप्रकारे तुम्हाला बुध ग्रहाविषयी माहिती नक्की आवडली असेल.
माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. शेअर केल्याने ज्ञान वाढते.