या ‘चार’ सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर होतो परिणाम

शरीरात निर्माण होणारे विषारी घटक पाण्याच्या सह्हायाने बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. या लेखाच्या माध्यमातून कोणत्या सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो हे पाहणार आहे.

कमी प्रमाणात पाणी पिणे

आपले शरीराचे 70 टक्के वजन केवळ पाण्याची असते. मानवी शरीरातील अवयव व्यवस्थित काम करण्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता असते.

शरीराला-पाण्याची-आवश्यकता

किडनीचे काम व्यवस्थित चालण्यासाठी पाण्याची गरज असते. त्याचबरोबर पाण्याच्या माध्यमातून वेगवेगळी पोषक तत्व किडनी पर्यंत पोचवली जातात.

शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त व्यवस्थित वाहते. त्यामुळे शरीरात थोड्या प्रमाणात पाण्याची कमतरता झाली तर तुम्हाला थकवा जाणवू शकतो.

मात्र जास्त प्रमाणात पाण्याची कमतरता झाली तर किडनीच्या आरोग्यास नुकसान देखील होऊ शकते.

आहारात मिठाचा जास्त वापर

मिठाचा आहारात अतिवापर शरीरासाठी हानीकारक आहे हे तुम्हाला माहीत असेलच.

शरीरात तयार होणारे टाकाऊ द्रव्य शरीराबाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. थोडक्यात किडनी हा आपल्या शरीरातील प्युरिफायर आहे.

salt

किडनीचे काम सोडियम आणि पोटॅशियम यांच्या संतुलनावर आधारित आहे. मिठामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते. याचा परिणाम म्हणून शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन बिघडते.

याचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे शरीरासाठी गरजेचे नसलेले आणि विषारी घटक बाहेर टाकण्याची किडनीची क्षमता कमी होते.

जर लवकर उपचार केला नाही, तर किडनी निकामी होण्याचा धोका असतो. त्यामुळे आहारात मिठाचे प्रमाण मर्यादित असावे.

धूम्रपान करण्याची सवय

सिगारेट मध्ये सरासरी 600 घटक असतात. जेव्हा लोक सिगारेट ओढतात, तेव्हा सात हजारांपेक्षा जास्त रसायने तयार होतात. त्यातील कमीत कमी 69 रसायने ही कॅन्सर साठी कारणीभूत आहेत.

kidney-health-in-marathi

एका संशोधनानुसार ज्या स्त्रियांनी गरोदरपणात धुम्रपान केले होते, त्यांच्या मुलांच्या किडनीचे नुकसान झाल्याचे दिसून आले.

हे संशोधन क्लिनिकल जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी ऑफ नेफरोलॉजी मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.
 
धुम्रपाना बरोबरच प्रदूषित हवेमुळे देखील किडनीला नुकसान पोहोचू शकते.

अल्कोहोल पिण्याची सवय

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम किडनी करते हे तुम्हाला समजलं असेलच.

त्यापैकीच एक घटक म्हणजे अल्कोहोल आहे. मात्र अल्कोहोल शरीराबाहेर टाकत असताना किडनीचे मात्र नुकसान होते.

alcohol

किडनी शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील योग्य ठेवत असते. अल्कोहोलच्या सेवनाने हे प्रमाण बिघडतेयाचा थेट परिणाम किडनीच्या कामावर होत असतो.

त्याचबरोबर रक्तदाब देखील वाढतो. किडनीचे आजार होण्याचे कारण म्हणजे रक्तदाब आहे. त्यामुळे अल्कोहोल पासून जेवढे लांब राहता येईल तेवढे राहावे.

अशा प्रकारे वरील सवयींचा किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो.

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. शेअर केल्याने ज्ञान वाढते.

या ठिकाणी दिलेली माहिती लोकांच्यात आरोग्याबद्दल माहिती व्हावी म्हणून दिली आहे. जर आपणास आरोग्याचा काही त्रास असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Comment