सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह ‘गुरु’ बद्दल रंजक गोष्टी

आपल्या सूर्यमालेतील सर्वात वेगाने फिरणारा ग्रह म्हणजे गुरु. गुरूचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग जवळपास 45000 किलोमीटर प्रतितास असून पृथ्वी पेक्षा 28 पटीने जास्त आहे.

याचा अर्थ असा आहे की गुरू ग्रहावरील दिवस हे सर्वात लहान असतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की गुरुला ग्रह स्वतःभोवती फिरण्यासाठी फक्त 10 तास लागतात. पृथ्वीला मात्र यासाठी 24 तास लागतात.

जर तुम्ही सूर्यमालेतील सगळ्या ग्रहांना एकत्रित केलं तरी त्यांच्या वजनापेक्षा 2.5 पटीने जास्त वजन गुरु ग्रहाचे आहे.

Image credit: NASA/JPL-Caltech/Harvard/Moore et al.

या ग्रहावर लिक्विड नायट्रोजनचा समुद्र आहे. त्यामुळे या ग्रहाला प्रचंड ताकदवान असे  मॅग्नेटिक फिल्ड प्राप्त होते. गुरु ग्रहाच्या खूप वेगाने फिरण्यामुळे या ग्रहावरील द्रव्य बाहेरील सगळ्या वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करत असतं. त्यामुळे तिथे एक मॅग्नेटिक फिल्ड तयार होते. हे मॅग्नेटिक फिल्ड पृथ्वीच्या मॅग्नेटिक फिल्ड पेक्षा 20,000 पटीने जास्त ताकदवान आहे.

गुरू ग्रहाला इतर ग्रहांचा ‘रखवाला’ म्हणून ओळखलं जाते. कारण हा ग्रह आपल्या  आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या खगोलीय घटकांना( जसे की धूमकेतू, उल्का) आपल्याकडे आकर्षित करतो. कारण त्याची गुरुत्वाकर्षण क्षमता खूप जास्त आहे. त्यामुळे पृथ्वीचा बचाव होतो.

आपल्याला माहीत असेल की शनी ग्रहाला कडा आहेत. मात्र या गुरू ग्रहाला देखील  कडा आहेत. मात्र त्या आपल्याला दिसत नाहीत.
 
सूर्यमालेत गुरु ग्रहाला सर्वात जास्त चंद्रांची संख्या आहे. आत्तापर्यंत त्याचे 79 चंद्र सापडले आहेत. या सूर्यमालेतील सर्वात मोठा चंद्र गानीमेडे (Ganymede) आहे आणि हा चंद्र गुरू ग्रहाचा आहे.

गुरू ग्रह संपूर्ण वायूचा बनल्याने त्या ठिकाणी स्थायुरूपातील पृष्ठभाग नाही. त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे यान उतरवता येऊ शकत नाही.

Image credit: NASA/JPL-Caltech/SwRI/MSSS/Gerald Eichstadt/Justin Cowart

तुम्हाला या चित्रात जो लाल टिपका दिसतोय, ते खूप मोठे वादळ आहे. हे वादळ आकाराने पृथ्वीपेक्षा 3 पटीने मोठे आहे. आणि हे वादळ कमीत कमी 340 वर्षापासून घोंगावत आहे. पृथ्वीवर पाण्याचा पाऊस पडतो. पण गुरु ग्रहावर निऑन या वायूचा पाऊस पडतो.

गुरु ग्रह सूर्याकडून जेवढी उष्णता घेतो त्यापेक्षा 3 पटीने जास्त उष्णता वातावरणात सोडतो. शास्त्रज्ञांकडून अशी शक्यता वर्तवली जाते की या ग्रहावर हिऱ्यांचा पाऊस पडतो.

Leave a Comment