मानवी शरीराविषयी 15 रंजक ‘तथ्य’ जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील

मानवी शरीरात वेगवेगळ्या क्रिया सतत घडत असतात. पण सहसा लोकांना त्या माहीत नसतात. या लेखातून आपण मानवी शरीराविषयी काही रंजक तथ्य जाणून घेणार आहे.

मानवी शरीराविषयी रंजक ‘तथ्य ‘

नवीन जन्मलेले बाळ सहा महिन्यापर्यंत एकाच वेळी श्‍वास घेऊ शकते आणि अन्नाचा घास देखील गिळू शकते. मात्र वय वाढल्यानंतर ही गोष्ट करणं शक्य होतं नाही. पहा एकदा प्रयत्न करून!

जेव्हा तुमचे हे वाक्य वाचून होईल तेवढ्या वेळेत तुमच्या शरीरातील 50,000 पेशी मरतील आणि लगेच नव्या पेशी तयार होतील.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की महिलांचे हृदय पुरुषांच्या ह्रदयापेक्षा जोराने धडकते. हाऊ रोमॅन्टिक!

human-blood

आपल्या शरीरात प्रत्येक पेशींना अन्न पुरवण्यासाठी रक्ताच्या वाहिन्यांचे जाळे आहे. हे जाळे जवळपास 1 लाख किलोमीटर लांबीचे आहे. आश्चर्याचा धक्का देणारी बाब!

जेव्हा तुम्ही विमानाने प्रवास करतात तेव्हा, तुमच्या केसांचा वाढण्याचा वेग हा जमिनीवर असण्याच्या तुलनेत जास्त असतो.

तुम्हाला माहित असेल की आपल्या शरीरातील हाडांसाठी कॅल्शियमची गरज असते. मात्र शरीरातील 99% कॅल्शियम हे फक्त दातांमध्येच असते.

झोपेत मेंदू जास्त ‘एक्टिव’

तुम्हाला वाटत असेल की रात्रीचे झोपल्यावर आपला मेंदू देखील झोपत असेल. मात्र तुम्ही जागे असल्यापेक्षा रात्रीचा मेंदू जास्त ‘एक्टिव’ असतो.

brain-in-marathi

नवीन जन्मलेल्या बाळाच्या शरीरात 300 हाडे असतात. मात्र माणूस प्रौढ झाल्यावर त्याच्या शरीरात फक्त 206 हाडेच शिल्लक राहतात.

लोकांना सोमवारी हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. कारण सकाळच्या वेळी शरीरात स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात. बहुतेक लोकांचे ऑफिस सोमवारी सुरू होत असते.

त्यामुळे ताण तणाव वाढतो. रक्तदाब वाढतो आणि रक्तदाब वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील वाढते.

डावा हात का उजवा हात

जगात काही लोक डाव्या हाताने लिहिणारे असतात, तर काही उजव्या हाताने.

मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की डाव्या हाताने लिहिणाऱ्यांची संख्या फक्त सात टक्के आहे.

लहान मुलांना खूप प्रश्न विचारायला आवडत असतात. संशोधकांनी यावरही अभ्यास केला आहे. चार वर्षाची मुले सरासरी दिवसाला 450 प्रश्न विचारत असतात.

गणितात आपल्याला सरळ रेषा काढायला शिकवले जाते. पृथ्वीतलावर फक्त माणूस असा प्राणी आहे की जो सरळ रेष काढू शकतो.

रसायनशास्त्राची प्रयोगशाळा

आपला मेंदू म्हणजे एक रसायनशास्त्राची प्रयोगशाळाच आहे. कारण मेंदूत दर सेकंदाला एक लाख रासायनिक प्रक्रिया घडत असतात. बापरे!

माणूस हा असा आहे एकमेव प्राणी आहे की जो आपल्या पाठीवर झोपतो.

benefits-of-good-sleep-in-marathi

तुम्ही माणसाला किती तास झोपेची गरज असते हा लेख वाचला असेल. सरासरी माणसाला झोपण्यासाठी सात मिनिटांचा कालावधी लागतो.

आपल्या डोळ्यांवर अचानक प्रकाश पडला तर आपण डोळे मिचकावतो. महिला पुरुषांपेक्षा दोन पटीने कमी डोळे मिचकावत असतात. अर्थात महिलांचे डोळे पुरुषांच्या डोळ्यापेक्षा जास्त वेळ उघडे असतात.

सगळ्यात मजबूत स्नायू

एखादा व्यक्ती काहीतरी विचित्र बोलत असेल तर आपण त्याला म्हणतो की, तुझ्या जिभेला हाड आहे का नाही?

जिभेत हाड नसते कारण जीभ स्नायू आहे. शरीरातील सगळ्यात ताकतवान स्नायू म्हणजे जीभ आहे.

उजव्या फुप्फुसाची क्षमता जास्त

माणसाच्या शरीरात दोन फुप्फुसे असतात. त्यातील उजव्या फुप्फुसाची हवा घेण्याची क्षमता, डाव्या फुप्फुसापेक्षा जास्त असते.

कारण डाव्या फुप्फुसाजवळ हृदय असल्याने त्याचा आकार लहान असतो.

डोळ्याचा आकार कधीच वाढत नाही

जन्माच्या वेळी जेवढा आपला डोळ्यांचा आकार असतो, तेवढाच आकार आयुष्यभर राहतो. मात्र कानाची आणि नाकाची वाढ कायम सुरू असते.

वर दिलेली मानवी शरीराविषयी रंजक माहिती तुम्हाला नक्कीच आवडली. नवीन माहिती मिळाल्यावर हे पेज आम्ही अपडेट करू.

Leave a Comment