पदार्थ तळल्यावर तेलावर का तरंगतो; जाणून घ्या त्यामागचं विज्ञान

सध्याच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात तळलेले पदार्थ खात असतात. हे पदार्थ जिभेचे चोचले पुरवणारे असतात. एखादा पदार्थ तळल्यावर तेलावर का तरंगतो हे या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे.

अनेक लोकांना तळलेले पदार्थ खायला आवडतात. यात पोटॅटो चिप्स, करंजी, समोसा, फ्रेंच फ्राईज या सारख्या पदार्थांचा समावेश असतो.

हे पदार्थ तळण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. हे पदार्थ जेव्हा तेलात तळले जातात तेव्हा काही वेळानंतर ते तेलावर तरंगून लागतात. तेव्हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की पदार्थ तळल्यावर तेलावर का तरंगतो.

चला तर जाणून घेऊया सोप्या भाषेत या प्रश्नाचं उत्तर आजच्या आपल्या या पदार्थ तळल्यावर तेलावर का तरंगतो पोस्ट मध्ये

पदार्थ तळल्यावर तेलावर का तरंगतो

जेव्हा तेलात पदार्थ तळले जातात, तेव्हा तेलाचे तापमान हे 177 ते 191 डिग्री सेल्सिअस इतके असते.

बटाट्याचे काप किंवा समोसा तेलात टाकला जातो, तेव्हा ते पदार्थ तळले जातात. या पदार्थांमध्ये काही प्रमाणात पाणी असते.

जेव्हा पाण्याचा संबंध गरम तेलाच्या सोबत येतो, तेव्हा पाण्याची वाफ होते. जेव्हा पदार्थ तळत असताना आपल्याला बुडबुडे दिसतात. ते पाण्याच्या वाफेमुळे तयार झालेली असतात.

तरंगणाऱ्या पदार्थांचं विज्ञान समजून घेण्यासाठी ‘घनता’ ही संकल्पना समजून घेणं गरजेचं असतं.

तेलाची घनता आणि पदार्थ तरंगण्याचा संबंध

घनता म्हणजे वस्तूचे वजन आणि आकारमान यांचे गुणोत्तर!

जेव्हा समोसा किंवा इतर पदार्थ तेलात तळले जातात, तेव्हा त्यांच्यातील पाण्याची वाफ होते. त्यामुळे पदार्थाचे वजन कमी होते आणि आकार वाढतो.

frying-science-in-marathi

त्यामुळे पदार्थाची घनता कमी होते. ही घनता तेलाच्या घनतेपेक्षा कमी होते. तेव्हा तो पदार्थ आपोआपच तेलावर तरंगू लागतो.

तुम्हाला माहित आहे बर्फ देखील पाण्यावर तरंगतो, कारण बर्फाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा खूप कमी असते.

आहे का नाही मजेशीर विज्ञान!

अशा प्रकारे तुम्हाला एखादा पदार्थ तळल्यानंतर तेलावर का तरंगतो हे नक्कीच समजलं असेल.

तेल हाताळताना घ्या काळजी

एखादा पदार्थ तळायच्या वेळी तेलाचं तापमान हे 200 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. हे खूप जास्त तापमान आहे.

या जाळीच्या भांड्यात पदार्थ तळले जातात. यासाठी ‘डीप फ्रायर ‘नावाची पद्धत वापरली जाते.

त्यामुळे अशा वेळी काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. एवढ्या तापमानाला तेल ज्वलनशील बनतं. त्यामुळे आगीच्या थोड्या संबंधाने देखील तेलाचा भडका उडू शकतो.

पदार्थ तळत असताना या तेलामध्ये पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी.

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. शेअर केल्याने ज्ञान वाढते.

Leave a Comment