कोरोना व्हायरसपासून कशी काळजी घ्यायची? जाणून घ्या

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या Covid-व्हायरसचा जास्त प्रसार होऊ नये म्हणून आपल्या सर्वाना काळजी घेणे अत्यंत गरजेचं झालं आहे. या लेखातून कोरोना व्हायरसपासून कशी काळजी घ्यायची हे पाहणार आहे.

Table of Contents

कोरोना व्हायरसपासून कशी काळजी घ्यायची

स्वास्थ आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये कोरोना व्हायरसपासून कशी काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन केले आहे.

स्वच्छ हात धुवा

पाणी आणि साबणाने 40 सेकंद हात धुवा. जर तुम्ही अल्कोहोल असणारं हँड वाॅश वापरत असाल तर 20 सेकंद पुरेसे आहेत Virus साठी.

जर तुमचा हात खराब झाला असेल तर लगेच साबणाच्या सहय्याने स्वच्छ करा.

हातरुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करा

खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोंडावर रुमाल ठेवा. रुमाल नसेल तर टिश्यू पेपरचा वापर करा. अन्यथा हाताच्या कोपराखाली खोकू शकता.

टिश्यू पेपरचा वापर केल्यावर तो तात्काळ बंद कचरापेटीत फेकून द्या जेणेकरून वायरस ला आळा बसेल.

चेहरा, डोळे, तोंड, नाक यांना हाताने स्पर्श करू नका

कोरोना वायरस लोकांच्या थुंकीतून एखाद्या पृष्ठभागावर पडू शकतो. नकळत आपला हात त्या पृष्ठभागाला लागू शकतो त्यामुळे हातावर किटाणू येऊ शकता म्हणून स्पर्श करणे टाळा.

त्यामुळे चेहरा, डोळे, तोंड, नाक यांना हाताने स्पर्श करू नका.

कमीत कमी तीन फुटाचे अंतर

समोरच्या व्यक्ती सोबत बोलत असताना त्याच्यापासून कमीत कमी तीन फुटाचे अंतर ठेवा.

आंबट चवीच्या फळांचा आहारात समावेश

जर आपल्याला कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा द्यायचा असेल तर आपली रोगप्रतिकारक क्षमता(Immunity) चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपण चांगला लढा देऊ शकु.

यासाठी आंबट चवीच्या फळांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. आंबट फळामध्ये विटामिन सी चे प्रमाण खूप जास्त असते.

स्वास्थ आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मास्क वापराविषयी देखील काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत त्या आपण खाली बगुया.

मास्क वापरताना काय काळजी घ्यायची

जर तुम्हाला खोकला, सर्दी यासारखा त्रास होत नसेल तर मास्क वापरण्याची गरज आहे कारण समोरच्याकडून आपले रक्षण मास्क करत असतो. कारण मास्क वापरल्यामुळे हात स्वच्छ धुण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याकडे दुर्लक्ष होऊ शकते हे होता कामा नये.

तुम्हाला सर्दी-खोकला-ताप यांचा त्रास होत असेल तर मास्क नक्की वापरायचा आहे त्यामुळे वायरस पसरण्यास आळा बसेल.

त्याचबरोबर तुम्ही आजारी व्यक्तीची काळजी घेत असाल तर मास्क वापरणं गरजेचं आहे कारण त्या वक्ती पासून संसर्ग टाळता येईल.

मास्क योग्य पद्धतीने घातला तर तो आठ तास प्रभावी काम करतो, त्यानंतर त्याची कार्य क्षमता कमी होते. जर वापरादरम्यान मास्क ओला झाला तर तात्काळ बदलणं गरजेचं आहे.

मास्कची विल्हेवाट कशी लावायची

वापरलेला मास्क ब्लीच सोल्युशन किंवा सोडियम हायड्रोक्लोराइड सोलुशन यांच्या मदतीने निर्जंतुक करायचं आहे.

त्यानंतर मास्क जाळून नष्ट करायचा आहे किंवा खोल खड्डामध्ये पुरायचा आहे.

कोरोना व्हायरसची लक्षणे कोणती आहेत

ताप, थकवा, कोरडा खोकला हे या व्हायरसचे साधारण लक्षण आहे. काही रुग्णांमध्ये घशात खवखव, हगवण यासारखी लक्षणे दिसून आली आहेत.

सुरुवातीला ही लक्षण सौम्य असतात आणि नंतर वाढत जातात. काही लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊन देखील त्यांच्यामध्ये लक्षणे दिसून येत नाहीत अश्या व्यक्तीकडून सर्वाधिक संसर्ग होतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या आजारातून जवळपास 80 टक्के लोक कोणत्याही उपचाराचा शिवाय बरे होतात.

वयोवृद्ध लोक आणि ज्यांना वैद्यकीय समस्यांचा सामना करावा लागत आहे (जसे की उच्च रक्तदाब, हृदयासंबंधीचे समस्या, डायबिटीज) त्यांना हा आजार लवकर होण्याची शक्यता आहे.

ज्या लोकांना ताप, खोकला आहे आणखी त्याच सोबत श्वास घेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे, हि सर्व वायरस ची लक्षणे आहेत दिसल्यास त्यांनी तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.

हवेतून कोरोना व्हायरस पसरतो का

आतापर्यंत झालेल जे काही संशोधन आहे त्यातून असे दिसून आले आहे की हा Covid व्हायरस खोकताना किंवा शिंकताना पडलेल्या थुंकीतुन पसरलेला आहे.

हा व्हायरस हवेतून पसरत असल्याचा कोणताही वैज्ञानिक संदर्भ नाही.

एखाद्या पृष्ठभागावर(Surface) कोरोना व्हायरस(Covid-19) किती काळ राहू शकतो :

सध्या हा व्हायरस एखाद्या पृष्ठभागावर किती काळ राहू शकतो याची ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही.

मात्र काही अभ्यासानुसार हा वायरस काही तासांपासून काही दिवसांपर्यंत पृष्ठभागावर राहू शकतो.

पृष्ठभागाचा प्रकार, त्या भागातील तापमान यावर देखील या व्हायरसचं आयुष्य अवलंबून आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या पृष्ठभागावर कोरोना व्हायरस असू शकतो, तर तो भाग Sanitizer च्या सहाय्याने निर्जंतुक करा. निर्जंतुक केल्यानंतर तुमचा हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे.

लोकांच्या गैरसमजुती आणि त्यामागचं सत्य

सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचसोबत समाजात या व्हायरस विषयी काही गैरसमजुती पसरत आहेत आपल्याला त्यांना बळी पडायचे नाही.

चला तर जाणून घेऊया या गैरसमजुती नेमक्या काय आहेत आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे हे आपण जाणून घेणार आहे.

उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात कोरोना पसरत नाही

सत्य: हा व्हायरस सर्व प्रदेशांमध्ये पसरत आहे. यात उष्ण आणि दमट हवामान असणाऱ्या प्रदेशांचा त्याचबरोबर थंड हवामानाच्या प्रदेशाचा देखील समावेश आहे.

गरम पाण्याने अंघोळ केल्याने कोरोना व्हायरस मरतो.

सत्य: आपल्या शरीराचे तापमान 36.5 डिग्री सेल्सिअस ते 37 डिग्री सेल्सिअस एवढे असते. एवढ्या तापमानात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.

त्यामुळे गरम पाण्याने अंघोळ करून काहीही फायदा होणार नाही. उलट जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला इजा होऊ शकते.

थर्मल स्कॅनरच्या मदतीने कोरोना रुग्णांना शोधता येतं.

सत्य: हे अर्धसत्य आहे. ज्यांना ताप आहे, असेच लोक थर्मल स्कॅनरच्या मदतीने शोधता येतात.

पण या व्हायरसची लक्षणे दिसण्यासाठी दोन ते दहा दिवसांचा देखील कालावधी लागतो.

संपूर्ण अंगावर अल्कोहोल फवारल्यास व्हायरस मरतो.

सत्यः ही चुकीची माहिती आहे. अल्कोहोल असणाऱ्या हॅन्ड वॉशचा वापर हात धुण्यासाठी करायचा आहे.

या हॅन्ड वॉश मध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते.

जर तुम्ही 100% अल्कोहोलचा वापर शरीरावर फवारण्यासाठी केला, तर तुम्हाला इजा होऊ शकते.

जर व्हायरस तुमच्या शरीरात गेला असेल तर याचा काहीही फायदा होणार नाही.

लसुन खाल्ल्याने कोरोना व्हायरसपासून रक्षण होते.

सत्य: लसुन आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. मात्र कोरोना व्हायरससाठी तो फायदेशीर ठरू शकतो याचा पुरावा नाही.

सध्या या आजारासाठी कोणत्याही प्रकारचं औषध उपलब्ध नाही. त्यामुळे कोणीही तुम्हाला या आजारासंबंधी औषध देण्याचा प्रयत्न केला तर ते घेऊ नका.

Leave a Comment