‘हे’ आहेत चांगल्या झोपेचे फायदे

झोप ही आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. झोपेमुळे आपल्या शरीराची दुरुस्ती होत असते. या लेखातून आपण चांगल्या झोपेचे फायदे जाणून घेणार आहे

आजच्या काळात झोपेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ताण तणाव, रक्तदाब, हृदयासंबंधीचे रोग यांच्यामध्ये वाढ झालेली आहे.

मात्र दररोज आपल्याला चांगली झोप मिळाली तर या समस्यांमधून सुटका मिळू शकते.

त्या अगोदर हे दोन लेख नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला चांगली झोप म्हणजे काय हे समजेल.

चांगल्या झोपेचे फायदे

झोपेमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते

अनेक संशोधनांनी दाखवून दिले आहे की ज्या लोकांना चांगली झोप मिळत नाही, असे लोक आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

जेव्हा तुम्ही झोपेत असता तेव्हा तुमच्या शरीरात सायटोकाईन नावाचं प्रोटीन तयार होतं.

जेव्हा तुम्ही आजारी पडता किंवा ताण तणावाला तोंड द्यावं लागतं, तेव्हा या प्रोटीनची निर्मिती होणे गरजेचं असतं.

मात्र तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल, तर या प्रोटीनची निर्मिती कमी प्रमाणात होते.

त्यामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढवायची असेल, तर दररोज सात ते आठ तासांची झोप घेणं गरजेचं आहे.

वजन नियंत्रित राहण्यास झोप मदत करते

वजन नियंत्रित राहण्यासाठी झोप महत्त्वपूर्ण ठरते. अपुऱ्या झोपेमुळे वजनात वाढ होते. हे अनेक संशोधनांमधून दिसून आले आहे.

प्रौढांपेक्षा लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. लहान मुलं कमी झोप घेत असतील, तर त्यांच्यामध्ये लठ्ठपणा वाढण्याचा धोका 90 टक्क्यांनी वाढतो.

चांगल्या झोपेमुळे मधुमेहाला दूर ठेवण्यास मदत

तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम इन्सुलिन करत असतात. हे इन्सुलिन नावाचं हार्मोन शरीरात तयार होतं.

आपली झोप योग्य प्रमाणात प्रमाणात होत नसेल तर इन्सुलिन निर्माण होण्याचे प्रमाण कमी होतं.

इन्शुलिन निर्माण होण्याचे प्रमाण कमी झाल्यावर रक्तातील साखर वाढते. त्यामुळे मधुमेह, हृदयविकार यासारखे आजार होण्याची शक्यता असते.

त्यामुळे शरीराला पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचे आहे.

ताण-तणाव कमी करण्यात झोप फायदेशीर

झोपेच्या अभावामुळे शरीरात ताण-तणावाच्या संबंधी हार्मोन्स तयार होतात. या हार्मोन्सच्या निर्मितीमुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

जेव्हा ताण-तणावाच्या संबंधी हार्मोन तयार होतात, तेव्हा हृदय जोरजोराने धडकते. त्यामुळे रक्तदाब देखील वाढतो.

ताण तणाव कमी करायचा असेल, तर झोपेसोबतच व्यायाम, योगासने, कामाचे योग्य नियोजन यासारख्या गोष्टी मदत करतात.

आठवड्यातून चार ते पाच वेळा अर्धा तास व्यायाम केल्यावर ताण तणाव कमी होण्यास मदत होते.

झोपेमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते

sleep

एका अभ्यासानुसार ज्या लोकांची पुरेशी झोप होत नाही, अशांमध्ये हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

एवढेच नव्हे तर या अभ्यासात असे देखील दिसून आले होते की प्रमाणापेक्षा जास्त वेळ झोप घेणे देखील हृदयासाठी धोकादायक आहे.

त्यामुळे झोप योग्य वेळी, योग्य प्रमाणात घेण कधीही चांगलंच!

हे चांगल्या झोपेचे फायदे तुम्हाला नक्कीच आवडले असतील.

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. शेअर केल्याने ज्ञान वाढते.

Leave a Comment