नेहमी आनंदी कसे रहावे? ‘या’ गोष्टी करून पहा

सध्याचं जीवन खूपच धावपळीचं झालं आहे. लोकांचा आनंद देखील स्पर्धेमुळे हरवला आहे. आजच्या या लेखातून आपणास आनंदी कसे रहावे हे सांगितले आहे.

प्रत्येकाला वाटत असते की आपण आनंदी रहावे. मात्र त्यासाठी नेमकं काय करावं हे समजत नाही. त्यासाठी खाली काही गोष्टी दिल्या आहेत. त्या नक्की करून पहा.

नेहमी आनंदी कसे रहावे

आवडीच्या गोष्टी कागदावर लिहा

anandi-kase-rahayche

तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही दहा गोष्टी एका पानावर लिहून काढा. अगदी कोणत्याही!

माणसाला प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी चूक काढायची सवय असते. पण तुम्हाला चागल्या गोष्टी दिसू लागल्यावर तुमचे विचार आणि मन आशावादी होईल.

तसेच तुमच्या मनात असलेल्या गोष्टी लिहून काढल्या, तर मन मोकळे होण्यास देखील मदत होते.

इतरांसोबत भावना शेअर करा

तुम्हाला जे काही वाटतं ते इतरांसोबत शेअर करायला शिका.

कारण त्यावर काही सकारात्मक प्रतिक्रिया येतील, तर काही वेळेस नकारात्मक प्रतिक्रिया येतील. मात्र तुमचं म्हणणं मांडलं, याचा आनंद काही वेगळाच असतो.

त्याच बरोबर इतरांना मदत मागायला कधीही लाज बाळगू नका. कारण मागितल्याने मिळते अशी काहीतरी म्हण आहे.

स्वतःसाठी फक्त पाच मिनिटं

सध्याच्या काळात लोक स्वतःपासून दूर जाऊ लागले आहेत. लोक समाजासाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी वेळ देतात. मात्र स्वतः साठी वेळ देत नाही.

तुमचा दिवस कितीही व्यस्त असला तरी स्वतःसाठी आवर्जून पाच मिनिटांचा वेळ काढा.

त्या वेळेत शांत बसा, फक्त श्वास घ्या. त्या श्वासावर लक्ष द्या. कोणताही विचार मनात आणू नका. यामुळे आपलं मन नक्कीच ताजतवानं होतं.

चांगली झोप घ्या आणि मोबाईलपासून लांब रहा

benefits-of-good-sleep-in-marathi

आनंदी राहायचं असेल तर चांगली झोप आवश्यकता आहे. झोपायला जायच्या अगोदर इंटरनेट वापरू नका.

फोन चांगल्या प्रकारे बंद करून झोपायच्या जागेपासून लांब ठेवा. त्याचबरोबर सकाळी उठल्यावर देखील फोन लगेच घेऊन मेसेज करत बसू नका.

समोरच्यासोबत सकारात्मक बोला

जेव्हा आपण लोकांसोबत बोलतो, तेव्हा कधी कधी आपल्या तोंडातून काही शब्द निघतात, जे समोरच्याला त्रासदायक ठरतात.

त्यामुळे कधीही समोरच्या सोबत बोलताना नेहमी सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करा.

कारण जर तुम्ही त्याच्यासोबत नकारात्मक बोलाल, त्याला तर वाईट वाटेलच. मात्र तुम्हाला देखील त्याचा त्रास होईल.

आवडीचे खेळ खेळा

आनंदी-राहण्याचे-उपाय-मराठी

आपण मोठे झाल्यावर लहानपणीचे खेळ विसरतो. कधी कधी ते खेळ खेळू देखील वाटतात. मात्र लोक काय म्हणतील या विचारात आपण त्यापासून लांब राहतो.

मात्र समाजाचा विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला जो लहानपणीचा खेळ आवडतो तुम्ही मनसोक्त खेळा. त्यातून मिळणारा आनंद तुम्हाला कुठेच मिळणार नाही.

अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्हाला आनंद मिळू शकतो. तुम्हाला आनंदी कसे रहावे याचे उत्तर नक्कीच मिळाले असेल.

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. शेअर केल्याने ज्ञान वाढते.

Leave a Comment