आमच्या विषयी

जगाच्या कानाकोप-यात दररोज नवीन गोष्टी घडत असतात नवीन इतिहास घडत असतो. याची माहिती आपल्याला असावी असे बहुतेक जणांना वाटत असते.

मात्र त्यात एक अडचण अशी आहे की सध्या इंटरनेटवर मराठी भाषेतील माहिती ही खूप नगण्य आहे. त्याचे प्रमाण हे 0.1 टक्क्यापेक्षा देखील कमी आहे.

हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही गाईडमराठी डॉट कॉम नावाची वेबसाईट सुरू केली आहे. तुम्हाला आरोग्य आणि विज्ञान या क्षेत्रातील दर्जेदार आणि एकदम खरी अशी माहिती मिळेल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कितीही शिकलो तरी मातृभाषेत वाचन करण्याची मजा काही वेगळीच.

अर्थातच ही माहिती तुमच्या समोर आणण्यासाठी आम्ही जागतिक स्तरावरील दर्जेदार अशा वेबसाईटचा वापर करतोय.

आरोग्य क्षेत्रातील माहिती देण्यासाठी त्याला ठोस वैज्ञानिक पुरावे लागतात. ते देखील आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतोय.

दररोजच्या जीवनात विज्ञानाच्या संदर्भात हजारो प्रश्न आपल्यासमोर येत असतात. मात्र त्यांची उत्तरे आपल्याला माहिती नसतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न देखील या वेबसाईटच्या माध्यमातून करतोय.

आम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत. अशा प्रकारची माहिती आमच्या वेबसाईटवर नसणार याची काळजी देखील घेतोय.

पुढे या वेबसाईट वर असणारी माहिती आणि त्याची कॅटेगिरी वाढवण्याचा देखील प्रयत्न असणार आहे. यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे, अपेक्षा आहे.

तुम्हाला जर आमच्या सोबत संपर्क साधायचा असेल तर guidemarathicom@gmail.com वर संपर्क साधा